Wednesday, April 27, 2016

राष्ट्रमित्र आयोजित आधुनिक शेळीपालन प्रशिक्षणाला प्रचंड प्रतिसाद



मुंबई/प्रतिनिधी: राष्ट्रमित्र बहुउद्देशिय सामाजिक संस्था आयोजित आधुनिक बंदिस्त शेळीपालन उद्योगाचे एक दिवसीय प्रशिक्षण नुकतेच (24 एप्रिल 2016) यशस्वीरित्या संपन्न झाले. देवनार येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थान मध्ये या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय किर्तीचे पशुतज्ञ डॉ. नितीन मार्कण्डेय, डॉ. माणिक धुमाळ, डॉ. आनंद देशपांडे व डॉ. बाबासाहेब नरळदकर यांनी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. अशा प्रकारचे प्रशिक्षण मुंबई येथे प्रथमच आयोजित झाल्याने त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला होता.
शिक्षणतज्ञ शिवाजी सानप, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर ठवाळ, नालंदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डी. के. केदार, राष्ट्रमित्रचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ठोंबरे, उद्योग सल्लागार उमेश राज व सतिश मोरे यांनी दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करुन प्रशिक्षणार्थीला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय किर्तीचे पशुतज्ञ डॉ. नितीन मार्कण्डेय व त्याचे सहकारी डॉ. माणिक धुमाळ, डॉ.आनंद देशपांडे व डॉ. बाबासाहेब नरळदकर यांनी पारंपारिक शेळीपालनाला आधुनिकतेची जोड देऊन शेळीपालन हा जोडधंदा न राहता तो मुख्य उद्योग कसा होऊ शकतो, शेळीपालनाला उद्योगाच्या नजरेतून कसे पहावे? शेळीपालनाचे मोठय़ा उद्योगात रुपांतर कसे करावे? समाजात असलेले गैरसमज? त्यांचे आजार कोणते? आजारापासून त्यांचे रक्षण कसे करावे? आजार झाल्यास त्यांना कोणते औषधोपचार करावेत? तांत्रिक व्यवस्थापन कसे करावे? गोठा कसा असावा? दुधासाठी कोणत्या जाती? मांसासाठी कोणत्या जाती? उद्योगासाठी कोणत्या जाती फायदेशीर? पौष्टीक चारा कोणता? या उद्योगाचे अर्थकारण काय? या व अशा अनेक बाबींची इत्यंभूत माहिती या प्रशिक्षण कार्यक्रमात दिली.
विशेष म्हणजे टाटा सामाजिक विज्ञान संस्थानच्या निसर्गरम्य परिसरात हा कार्यक्रम आयोजित केला गेला. विषय अधिक स्पष्ट करण्यासाठी या प्रशिक्षणात दृक्यश्राव्य माध्यमाचाही वापर प्रथमच करण्यात आला होता. तरुण, ज्येष्ठ नागरिक व महिलांचाही मोठय़ा प्रमाणात सहभाग होता.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र, सखोल माहिती असलेली सीडी व आवश्यक असलेल्या साहित्याचे प्रशिक्षणार्थींना मोफत वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प संचालक प्रभाकर शेळके, प्रशांत अन्नपुरे, विकास मिराशी, उद्धव ठोंबरे, अशोक चव्हाण व शुभम ठोंबरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रभाकर शेळके
प्रकल्प संचालक
8828287733
8828287744

राष्ट्रामित्र शेळी पालन प्रशिक्षण